Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तूळ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Updated: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (14:22 IST)
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील आणि तुमच्या कल्पना आकार घेतील आणि तुम्ही तुमच्यासाठी अनुकूल गोष्टी करून घ्याल. आळस टाळावा. तुमचे सहकारी तटस्थ असतील. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या क्षमतांवर विसंबून असावे. जानेवारी ते मार्चदरम्यान तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुमच्या मेहनतीमुळे नवे उपक्रम राबविले जातील. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये तुम्ही जे काम कराल त्यातून बाजारपेठेतील प्रतिमा उंचावेल. नोकरदार व्यक्तींना पूर्वी वरिष्ठांनी काही आश्वासन दिले असेल, तर त्याप्रमाणे पगारवाढ किंवा बढती मिळण्याचे योग संभवतात. बेकार व्यक्तींना काम मिळाल्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. एप्रिलच्या सुमारास तुमच्या संस्थेत बदलाचे वारे वाहू लागतील. चांगल्या नोकरीकरता परदेशी जाऊ इच्छिणार्‍यांना सप्टेंबरनंतरचा काळ विशेष चांगला आहे. विद्यार्थी मेहनत करतील आणि त्यांना त्यांच्या 
कष्टांचे फळही मिळेल. एकूण पाहता, हे तुमच्यासाठी प्रगतिशील वर्ष असेल. तुम्ही उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान.... 
गृहसौख्य व आरोग्यमान... 
कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात आनंद मिळविण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. जानेवारी ते मार्च महिन्यांदरम्यान तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू राहतील. कौटुंबिक आयुष्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी नसाल कारण तुमच्यात अलिप्ततेची भावना असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे काहीसे दुर्लक्ष होईल. जुनी प्रॉपर्टी विकून नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्याचे योग एप्रिल ते पुढील दिवाळीपर्यंत संभवतात. तरुणांपुढे करायचा की परेदेशाची संधी घ्यायची असा विचार पडेल.विवाह कमी अंतराचे आणि काही परदेशातील प्रवासही संभवतात. मुले सुखात असतील आणि आयुष्यातील आनंद उपभोगतील. मार्च महिन्यानंतर वैवाहिक आयुष्यात सुधारणा होईल. प्रकृतीच्या दृष्टीने नवीन वर्ष जरे अनुकूल असले तरी एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिन्यात थोडा त्रास संभवतो.

सर्व पहा

श्री नित्यानंद राया आरती, जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

आज विवस्वत सप्तमी; सूर्यपुत्र वैवस्वत मनूची ही पौराणिक कथा नक्की वाचा

आज श्री ताप्ती जयंती, महत्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments